
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील श्री विनायक सुझुकी शोरुमने भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. सकाळी शोरुममध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
या ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर घोषणा देत बाईक रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाला भीमराव बाबाजी सावंत, पूजा भीमराव सावंत आणि मयूर ज्ञानदेव पाताडे व कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती. या उपक्रमातून त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात भर घातली.