VHP ची बाईक रॅली...!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 15, 2022 12:16 PM
views 211  views

मालवण : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मालवणात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो दुचाकिस्वार सहभागी झाले होते. एसटी स्टॅण्ड येथून सुरु झालेली ही रॅली मालवण भरड बाजारपेठ मार्गे पुन्हा भरड देऊळवाडा येथून कुंभारमाठ समर्थ हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारकाजवळ रॅलीची सांगता झाली.

संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान ‘घर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जात आहे. तर अनेक ठिकाणी रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. मालवणात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, यासह विश्व हिंदू परिषदेचे विलास हडकर, भाऊ सामंत, बबन परुळेकर, तालुका कार्यवाह संदीप बोडवे, हर्षद हळदणकर, मंदार झाड, यासह मोठ्या संख्येने दुचाकिस्वार रॅलीत सहभागी झाले होते. मालवण एस टी स्टँड येथून दुचाकी वरून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. राष्ट्र प्रेमी नागरिक तिरंगा रॅली मध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. सर्वांचे विश्व हिंदू परिषद मालवणच्या वतीने आभार मानण्यात आले.