
कुडाळ : कुडाळ येथे ओमनी कार व ज्युपिटर दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा - बांबुळी येथे हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या जखमीवर कुडाळ येथे उपचार सुरू आहेत. हा अपघात सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कुडाळ एम.आय.डी.सी. येथील एच.पी. गॅस एजन्सी नजीक घडला.