देवगडात महिलांना मोठी संधी

प्रस्थापितांना धक्का पं. स. आरक्षण
Edited by: स्वप्नील लोके
Published on: July 28, 2022 17:00 PM
views 210  views

देवगड : 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीत तहसीलदार मारुती कांबळे यांनी जाहीर केली.त्यात अनेकांना धक्का बसला आहे. आरक्षण पुढीलप्रमाणे

 

अनुसूचित जाती महिला -शिरगाव
नामप्र महिला – पुरळ, दाभोळे,
नामाप्र प्रवर्ग – नाडण, पडेल,
सर्वसाधारण महिला -कुवळे, महाळुंगे, विजयदुर्ग, बापर्डे, मोंड,

सर्वसाधारण प्रवर्ग – पोंभुर्ले, गोवळ, कुणकेश्वर, किंजवडे, मिठबाव, मुणगे याचा समावेश आहे.

ही आरक्षण सोडत काचेच्या भांड्यातून चैतन्या पांचाळ या लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढून काढण्यात आली.प्रांताधिकारी वैशाली राजमाने तहसीलदार मारुती कांबळे नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत होत आहे. या आरक्षण सोडत कार्यकमदरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, काँग्रेस तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, रवींद्र जोगल, माजी जि प सदस्या वर्षा पवार आदींसह सर्व राजकीय पक्षीय कार्यकर्ते उपस्थित आहेत.