
वैभववाडी : तहसील कार्यालयासमोर महीलांची दोन उपोषणे सुरू आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या या उपोषणाला एकाही अधिकारी यांनी चर्चेसाठी भेट दिली नाही. महीला दिनी महीलांची उपेक्षा झाली आहे.
शहरातील स्टाॅल हटाव मोहीमेविरोधात स्टाॅलधारक महीलांच उपोषण सुरू आहे. तसेच नगरपंचायत प्रशासनाविरोधात नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी उपोषण सुरू केले आहे. सकाळी ११ वाजल्यापासून ही दोन्ही उपोषणे सुरू आहेत. मात्र याठिकाणी तालुक्यातील एकही जबाबदार अधिकारी चर्चेकरिता उपोषण स्थळी आले नाहीत. हिच का प्रशासनाची महीला प्रती आदराची भुमिका आहे, असा सवाल उपोषण कर्त्या महीला विचारत आहेत.