वैभववाडी : ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील गटबाजी कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
आज जिल्हा कार्यकारिणीत त्यांनी हा राजीनामा सचिव विनायक राऊत व संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.येत्या दोन दिवसांत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर बोलणार असल्याचे श्री.रावराणे यांनी सांगितले.