सिंधुदुर्गातील ४ रेल्वे स्थानक परिसरातील कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 07, 2023 13:17 PM
views 1414  views

कणकवली : सिंधुदुर्ग नगरी, कुडाळ, तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकाला जोडणारे रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम महाराष्ट्र शासनाने हाती घेतले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उद्या आठ ऑगस्ट रोजी काँक्रीट करण  व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन होणार आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री आमदार खासदार हे देखील उपस्थित असणार आहेत त्यामुळे आता गणेश चतुर्थीच्या पूर्वी या रस्त्यांचे काम पूर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून युद्ध पातळीवर  हे काम हाती घेणार असून पर्यटन दृष्टीकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकसित करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड सांगितले.