भोसले फार्मसी कॉलेजचा निकाल ९५ टक्के

Edited by: विनायक गांवस
Published on: June 30, 2024 08:22 AM
views 94  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे आज डी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा निकाल उत्कृष्ट लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण १११ विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे यापैकी १०१ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजचा एकूण निकाल ९५ टक्के लागला असून यापैकी प्रथम श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९६ टक्के एवढे आहे.

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये डी.फार्मसीचे दोन विभाग कार्यरत असून कॉलेज ऑफ डी.फार्मसी मधून दीप्ती पिंगुळकर ८५.४५ हिने प्रथम, अपूर्वा भांडारकर  ८४.४२ हिने द्वितीय व पूनम वराडकर हिने ८४.३६ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. कॉलेजच्या इंटीग्रेटेड डी.फार्मसी विभागातून मंथन सावंत ८४ याने प्रथम, हर्षदा म्हाडगुत ८२.९१ हिने द्वितीय व अनिकेत चोपडे ८२. ३६ याने तृतीय क्रमांक संपादन केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे व विभाग प्रमुख ओंकार पेंडसे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.