भोसले नॉलेज सिटीचा 9 वा वर्धापन दिन उत्साहात

Edited by: विनायक गावस
Published on: June 06, 2023 19:03 PM
views 72  views

सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटीचा नवव्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेमध्ये आज श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले व अध्यक्षा सौ.अस्मिता सावंत-भोसले यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली. यावेळी सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कर्मचारी वर्गातर्फे भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

2014 मध्ये अच्युत भोसले यांनी चराठ्याच्या माळरानावर ज्या निर्धाराने या भोसले नॉलेज सिटीची पहिली वीट रचली त्याची परिपूर्ती झाल्याची भावना प्राध्यापक वर्गाकडून व्यक्त केली‌. केवळ दीडशे विद्यार्थ्यांच्या साथीने सुरू झालेला हा प्रवास गेल्या नऊ वर्षात दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी संख्येवर जाऊन पोचला आहे.

पॉलिटेक्निक, बी.फार्म, डी.फार्म, एम.फार्म, सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल असा संस्थेचा पसारा वाढत असून  सिंधुदुर्गासह गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील विद्यार्थी भोसले नॉलेज सिटीत शिक्षणासाठी येऊ लागल आहेत. नुसतंच शिक्षण न देता संस्कारक्षम शिक्षण देणारं हे विद्येचं संकुल बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट, एनबीए, नॅक, बेस्ट पॉलिटेक्निक अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांमुळे राष्ट्रीय पातळीवर देखील आपला ठसा उमटला आहे‌.