भोसले इंटरनॅशनल स्कूल आणि वायबीआयएस किड्सचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: विनायक गांवस
Published on: December 27, 2022 17:04 PM
views 139  views

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल आणि वायबीआयएस किड्स या शाळांचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन 'द ग्लोरी ऑफ इंडिया' मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते.

     कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भारत देशाची सुंदरता, विविधता आणि देशभक्तीपर गीतांवर नृत्ये सादर केली. यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक व्यंकटेश बक्षी तसेच वायबीआयएस किड्सच्या मुख्याध्यापिका उमा झारापकर यांनी शाळेच्या वार्षिक शैक्षणिक अहवालाचे वाचन केले.

     युवराज लखमराजे भोसले यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, सदस्या सरोज देसाई, सानिका देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, रजिस्ट्रार प्रसाद महाले, पॉलिटेक्निक प्राचार्य गजानन भोसले, बी फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्वेता खानोलकर, सूत्रसंचालन सर्व शिक्षिकांनी तर आभार प्रदर्शन नेहा महाडेश्वर यांनी केले.