भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप 'बेस्ट प्रिन्सिपल' पुरस्कारानं सन्मानित

गौरवास्पद कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसलेंनी केलं अभिनंदन
Edited by: विनायक गावस
Published on: December 08, 2023 10:53 AM
views 49  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.विजय जगताप यांना नुकताच 'बेस्ट प्रिन्सिपल' हा पुरस्कार प्राप्त झाला. ईएसएफई स्किल शेअर आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे आयोजित एका सोहळ्यात हा पुरस्कार डॉ. जगताप यांना प्रदान करण्यात आला.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी डॉ.जगताप यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंत भोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, रजिस्ट्रार प्रसाद महाले व फार्मसी कॉलेजचा शिक्षक वर्ग उपस्थित होता.