
वेंगुर्ला : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांची भूमिपूजन शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आली. वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे ते झाराप रास्ता, वेतोरे ते नमसवाडी रस्ता, मातोंड- पेंडूर -सातवायंगणी ते घोडेमुख जोडणारा रस्ता, दाभोली वायंगणी रस्ता, आडेली कांबळेवीर ते धरण भोवरवाडी रस्ता आदी रस्त्यांची भूमिपूजन यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.
आडेली भोवरवाडी रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी आडेली सरपंच यशश्री कोंडस्कर, ग्रामपंचायत सदस्य सुधीर धुरी, प्रमोद गवळी, वर्षा आडेलकर, माजी सदस्य लीलाधर मांजरेकर, संतोष पेडणेकर, विष्णू कोंडस्कर, कामळेवीर देवस्थान कमिटी सदस्य दाजी पाटकर, आपा मांजरेकर, गणेश होडावडेकर, बाळा पाटकर, हनुमंत पाटकर, मोहन मांजरेकर, गुंडू कांबळी, संदीप मांजरेकर, दाजी मांजरेकर, शाखाप्रमुख सुहास मांजरेकर, रुपेश गवंडे, ताता मांजरेकर, सतीश मांजरेकर, शिवराम धुरी, विलास धुरी, यशवंत मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, यशवंत धुरी, गौरेश धुरी, निखिल धुरी, विशाल धुरी, मयुरेश धुरी, गणेश मांजरेकर, मंगेश आडेलकर, राधाकृष्ण पाटकर, बाबा पाटकर, माजी पोलीस पाटील भोवर, श्री खोत, श्री बागायतकर आदी उपस्थित होते.
तसेच मातोंड- पेंडूर -सातवायंगणी ते घोडेमुख जोडणाऱ्या रस्त्याचे भूमीपूजन तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सातवायंगणी येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख देवा कांबळी, जेष्ठ शिवसैनिक उत्तम वैद्य, सोसायटी संचालक सुहासिनी वैद्य, ग्रामपंचायत सदस्य निलेश वैद्य यांच्यासाहित स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.