तळवडेत विविध विकासकामांचे भूमिपूजन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 14, 2024 14:23 PM
views 91  views

देवगड : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून तळवडे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले  यामध्ये  २५:१५ योजनेतून तळेबाजार निपाणी देवगड ते नंदू मांजरेकर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. २५:१५ योजनेतून काजरघाटी बंदर प्रदीप लब्दी घर ते हरिहरेश्वर मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. आमदार नितेश राणे  यांच्या स्थानिक विकास निधीतून श्री. पावणाई मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.आदी विकास कामांचा समावेश आहे.

 या कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार नितेश राणे,भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,भा.ज.प जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर, जिल्हा सदस्य अमोल तेली, माजी सभापती नंदू देसाई, सरपंच गोपाळ रूमडे, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पंकज दुखंडे ,गणेश लाड, मानसी माणगावकर ,भावना शिंगरे, भाग्यश्री धुरी ,सुजाता घाडी, ग्रामस्थ भास्कर धुरी , विजय लाड, दिनकर घाडी, एकनाथ घाडी, सुधीर मापसेकर, संजय रूमडे,पोलीस पाटील अनिल लाड,बागतळवडे पोलीस पाटील राजेश साटम, देवगड महिला भाजप उपाध्यक्षा माजी सरपंच श्वेता शिवलकर, पूजा दुखडे आदींसह भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.