नाडणमधील विविध विकासकामांचं भूमिपूजन

Edited by:
Published on: January 05, 2024 17:40 PM
views 178  views

देवगड : देवगड येथील नाडण गावातील विविध विकासकामांची भूमिपूजने आमदार नितेश राणे  यांच्या हस्ते करण्यात आली, सोबत उपस्थित माजी आमदार, अजित गोगटे, बाळा खडपे, आरिफ बगदादी, प्रकाश राणे, संदीप साटम,उत्तम बिर्जे, बंड्या नारकर, अंकुश ठुकरुल, श्री. संजय बोंबडी, मकरंद जोशी, सरपंच संतोष कानडे, उपसरपंच  प्रतीक्षा केळकर, पडेल सरपंच भूषण पोकळे, ग्रामपंचायत सदस्य,अतुल हळदनकर, व इतर मान्यवर व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

या वेळी पावणाई मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच नाडण, मुख्य रस्ता, जोशी वठार ते पावणाई मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. सुमारे आठ लाख रुपये खर्चाचे हे काम असून डोंगरी विकास कार्यक्रमातून या विकास कामासाठी तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, प्रकाश राणे, संजय बोंबडी, युवा सेलचे तालुकाध्यक्ष उत्तम बिरजे, अरीफ बगदादी, बंड्या नारकर, मकरंद जोशी पडेल गावचे सरपंच भूषण पोकळे व अन्य भाजपा पदाधिकारी अधिकारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.  विकासाच्या मुद्द्यावर आपण एकत्र येऊन काम करू व गावाचा विकास करू असे प्रतिपादन यावेळी-आमदार नितेश राणे यांनी केले.

तसेच  वाडा गावच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही तुमचा पक्ष कोणताही असो असे आमदार म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की विकासाच्या मुद्द्यावर आपण एकत्र येऊन काम करू व गावाचा विकास करू असं मत आमदार नितेश राणे यांनी वाडा येथे व्यक्त केले. देवगड तालुक्यातील वाडा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निधीतून सांस्कृतिक भवन उभारणी होणार आहे. तसेच आमदार नितेश राणे यांच्या निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाचे विस्तारीकरण होणार आहे.

या दोन्ही कामाची भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. देवगडचा आमदार कायमच विरोधी पक्षाचा असतो ही संकल्पना गेले दोन वर्षात मोडीत निघाली आहे. मी माझ्या मतदारसंघांमध्ये एवढा निधी आणला आहे. की त्यांची भूमिपूजन करायला नारळ कमी पडतील मात्र विकासासाठी निधी कमी पडणार नाही. माझ्या मतदारसंघातील विकासासाठी मी कोणताही पक्ष पाहत नाही. विकासासाठी एकत्र या मी विकास करण्यासाठी सक्षम आहे.वाडा गावच्या सरपंच व उपसरपंचाने विकासासाठी हाक मारावी मी सदैव तयार आहे. तुम्हाला कोणताही त्रास झाल्यास सांगावे आम्ही भाजपाचे गमछे गाडीतच घेऊन फिरतो अशा शब्दात त्यांनी वाडा गावच्या सरपंचांना व उपसरपंच यांना आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर गावचे सरपंच सुनील जाधव उपसरपंच विनायक घाडी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, युवा सेलचे तालुकाध्यक्ष उत्तम बिरजे, अरीफ बगदादी, बंड्या नारकर, पडेल गावचे सरपंच भूषण पोकळे व अन्य भाजपा बद्दल अधिकारी स्थानिक ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते.