किर्लोस ते आंबवणे खांदारवाडी रस्त्याचा वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन !

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 07, 2024 06:35 AM
views 75  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किर्लोस ते आंबवणे खांदारवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी २ कोटी ५० लाख रु. मंजूर केले आहेत. या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मंगळवारी पार पडला. 

          महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मतदारसंघातील अनेक रस्ते मंजूर करून घेतले आहेत. या कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन ८ महिने झाले असून कामांच्या वर्कऑर्डर सध्याच्या राज्य सरकारकडून राखडविण्यात आल्याने कामांची पुढील कार्यवाही थांबली होती. सदर रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने आ. वैभव नाईक यांनी आंदोलन करून संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने आता या रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत. 


         यावेळी किर्लोस येथे शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, विभागप्रमुख बंडू चव्हाण, उपसरपंच अजित लाड,माजी सरपंच प्रदीप सावंत, शाखा प्रमुख विकास लाड चेअरमन स्वानंद भावे, श्रीधर गावडे, रामचंद्र लाड, रमेश लाड, संतोष लाड, सत्यवान चव्हाण, संतोष घाडीगावकर, गुरु चव्हाण, पंढरी घाडीगावकर,गणेश घाडीगावकर,दशरथ घाडीगावकर, हेमंत लाड, मोहन लाड, बाबू किर्लोसकर, हर्ष महाडिक, योगेश लाड, विजय लाड, हितेन लाड, गुरु चव्हाण, तृप्ती लाड, विनोद खांदारे, जयसिंग वारंग, जयश्री लाड, मोहन लाड, जयसिंग कुबल, बाळा कुबल, शंकर लाड, विजय वारंग, नाना घाडीगावकर,सुनीता चव्हाण, श्रद्धा गावडे, मानसी भावे, निशिकांत महाडिक आदीसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.