
वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व होडावडा ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत होडावडा सुभाषवाडी येथील नळपाणी योजना दुरुस्ती करणे या ५७ लाख ७८ हजार रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
होडावडा सुभाषवाडी येथील नळपाणी योजना दुरुस्ती करणे या कामाअंतर्गत ४० फूट उंच पाण्याची टाकी व ३०×४० विहीर तसेच विहिरीपासून टाकी पर्यंत नवीन पाईप लाईन ही कामे करण्यात येणार आहेत. या योजनेचा मोठा फायदा येथील सुभाषवाडी, ख्रिश्चनवाडी, परबवाडी यांना होणार आहे. या शुभारंभ प्रसंगी सरपंच अदिती नाईक, नवनिर्वाचित सरपंच रसिका केळुसकर, नवनिर्वाचित सदस्य अमृता साळगावकर, अरविंद नाईक, सावी कोंडुस्कर, सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी, सीताराम पार्सेकर, ग्रा प सदस्य संदेश सावंत, विलास सावंत, विशाल टोपले, किशोर नाईक, बाबू कोंडुस्कर, दिवाकर पंडित, सुनील माईणकर, विलास दळवी, शंकर नाईक, रवींद्र केळुसकर, शैलेश धावडे, नारायण शिरोडकर आदी उपस्थित होते.