रेडीतील श्री देवी माऊली मंदिराच्या अन्नक्षेत्र सभागृह, भक्तनिवासाच्या सुशोभिकरणाचं भूमिपूजन !

Edited by: भरत केसरकर
Published on: March 09, 2024 10:31 AM
views 107  views

सावंतवाडी : श्री देवी माऊली मंदिर रेडी येथे अन्नक्षेत्र सभागृह व भक्तनिवास व मंदिर सुशोभीकरण कार्यक्रमाचे ऑनलाईन भूमिपूजन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी भाजपचे नेते व माजी खासदार कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व रेडी गावातील पंचक्रोशीतील सर्व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.