मनसेच्या संतोष शिंगाडेंच्या हस्ते विविध कामांची भूमिपूजने

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 30, 2023 15:57 PM
views 117  views

देवगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली,देवगड,वैभववाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे यांचा विधानसभा मतदारसंघ कार्यक्रम
सकाळी देवगड येथील सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांची आढावा बैठक घेऊन पार पडला. या कार्यक्रमामध्ये देवगड-कातवन नाका येथे मनसे च्या नव्या शखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कातवण येथे सोलर स्ट्रीट लाईटचा लोकार्पण सोहळा देखील यावेळी करण्यात आला. तसेच कुणकेश्वर येथे सोलर स्ट्रीट लाईटचा लोकार्पण सोहळा यावेळी करण्यात आला. देवगड- तोरसोळे येथे शाखेचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. याप्रसंगी मनसे उपजिल्हा अध्यक्ष चंदन मेस्त्री, तालुकाध्यक्ष संतोष मयेकर,नंदकिशोर हडकर,मंगेश कातवणकर,अमोल पाटील, महेश नलावडे, बबलू परब, राजन पवार आदी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.