थळकरवाडी - पडवे चिरेखाण रस्त्याच्या कामाचं वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 18, 2023 19:00 PM
views 76  views

सिंधुदुर्गनगरी : गावराई तेलीवाडी थळकरवाडी आणि पडवे चिरेखाण रस्त्याचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पार पडले. कुडाळ तालुक्यातील गावराई तेलीवाडी थळकरवाडी जिल्हा वार्षिक निधीतून रस्त्याच्या कामाला मान्यता मिळाली असून  सदर रस्त्याचे डांबरीकरण  कामाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी पं.स सभापती बबन बोभाटे , विभाग प्रमुख  नागेश  त ओरोसकर, सचिन कदम यासह गावराई सरपंच सोनाली शिरोडकर, कसाल उपविभाग प्रमुख हरी  वायगणकर ,कृष्णा गावडे आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते, तर पडवे येथील सतोष शिरवलकर, यशवंत सावंत विजया परब लक्षमी सावंत आदी सह उपस्थित होते.

यावेळी आमदार वैभव नाईक यांनी गावच्या प्रथम नागरिक सोनाली शिरोडकर यांच्या हस्ते गावराई तेलीवाडी थळकरवाडी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला. पडवे चिरेखाण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ पडवे सरपंच आनंद दामोदर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला.

यावेळी गावांच्या विकासाच्या कामाबाबत आमदार वैभव नाईक यांनी चर्चा करून गावातील अनेक कामे यापूर्वी मंजूर करून झाली असून उर्वरित टप्प्या टप्प्याने विकास कामे हाती घेऊन जास्तीत जास्त कामांना गती देण्याचा आपला मानस आहे ,जनतेने आतापर्यंत दिलेले प्रेम आणि सहकार्य असेच पुढे ठेवून आपल्या गावाचा विकास साधावा असेही त्यांनी सांगितले, शेवटी उपस्थित आमचे आभार मानण्यात आले.