
सिंधुदुर्गनगरी : रविवार ७ जुलै रोजी मंगांव येथील निर्मला नदीत पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेले दत्ताराम भोई यांचा मृतदेह तब्बल नऊ दिवसांनी पावशी येथे मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील दत्ताराम लाडू भोई, राहणार माणगाव, ता. कुडाळ, वय वर्षे ६०, हे दिनांक ०७ जुलै रोजी नदीमध्ये वाहून गेले होते त्यांचा मृतदेह आज दि.15.07.2024 रोजी .पावशी शेलटेवाडी येथील भंगसाळ नदीमध्ये सापडला आहे.पुढील कार्यवाही सुरू आहे.