
सावंतवाडी : क्रीडातपस्वी कै. शिवाजीराव भिसे सर यांचा स्मृतिदिन कार्यक्रम सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाला. कै. भिसे सरांचे सावंतवाडीतील क्रीडा क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान होते सावंतवाडीतील कळसुलकर हायस्कूलच्या क्रीडा इतिहासात भिसे सरांनी केलेले काम अलौकिक दर्जाचे होते असे प्रतिपादन भिसे सरांचे शिष्य श्री दिलीप वाडकर यांनी व्यक्त केले तसेच भिसे सरांनी त्या काळात सावंतवाडीतील क्रीडा उपक्रमांसाठी केलेल्या मदतीची आठवण करुन दिली भिसे सरांच्या काळात आलेले अनेक अनुभव ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष वैज यांनी करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे खजिनदार श्री मुकुंद वझे यांनी त्यांना अल्पकाळ शिक्षक म्हणून लाभलेल्या भिसे सरांकडून अस्खलित हिंदी मधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सूचना तसेच विद्यार्थ्यांना सरांबद्दल वाटणारी आदरयुक्त भीती याबाबतच्या आठवणअध्यक्षीय भाषणातून कथन केल्या. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे खजिनदार श्री मुकुंद वझे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर, भिसे सर यांचे चिरंजीव प्रसिद्ध छायाचित्रकार अनिल भिसे, पुतणे अरुण भिसे, क्रीडा मार्गदर्शक दिलीप वाडकर ,प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक संतोष वैज ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत , सरांचा माजी विद्यार्थी महेश देऊलकर उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भिसे सरांचे सुपुत्र अनिल भिसे यांनी शाळेतील दोन गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एन. पी. मानकर यांनी केले तर सूत्रसंचालन ए. जे. ठाकर यांनी केले.