मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमांतर्गत भेडशी प्रशाला तालुक्यातील अव्वल

Edited by:
Published on: September 25, 2024 08:08 AM
views 246  views

दोडामार्ग : मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल भेडशी प्रशालेने दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावीला असून या उत्तुंग यशाबद्दल प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नाईक व सर्व स्टाफचे गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी विशेष अभिनंदन केलं आहे. 

शाळा भेटीसाठी व संपर्क फाउंडेशन कार्यशाळा उद्घाटन समारंभासाठी भेडशी प्रशालेमध्ये दाखल झालेले गटशिक्षणाधिकारी नदाफ यांनी हे अभिनंदन केलं. यावेळी त्यांचे समवेत शिक्षण विस्तार अधिकारी सौ. दीपा दळवी,   सौ.लोंढे , केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक, गट साधन केंद्राचे विषयतज्ञ प्रदीप देसाई, जयवंत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशालेन प्राचार्य नाईक सरांच्या नेतृत्वाखाली प्रशालेने राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. शालेय इमारत, शालेय व्यवस्थापन, सहशालेय उपक्रम, शासकीय विद्यार्थी हिताच्या राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना, प्रशालेचे विविध विषयांचे विभाग व त्यांचे नियोजन, ग्रंथालय, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह, क्रीडांगण, संगणक विभाग, सोलर डिजिटल  क्लासेस, शैक्षणिक उठावांतर्गत झालेली प्रशालेच्या  इमारत दुरुस्तीची सर्वकामे, पायाभूत व भौतिक सुविधा, सर्व आजी- माजी विद्यार्थी, संस्था, शिक्षणप्रेमी, हितचिंतक, देणगीदार, दानशूर व्यक्ती, उद्योजक, ग्रामस्थ, यांच्याशी  सुसंवाद साधून प्रशालेमध्ये निर्माण झालेल्या सर्व सोयी विषयी श्री. नदाफ साहेब यांनी संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शालेय समिती, शिक्षक पालक संघ आणि  सर्व ग्रामस्थ या सर्वांना धन्यवाद दिले. प्राचार्य नाईक या यशस्वी वाटचालीसाठी संस्थेच्या अध्यक्षा कल्पना तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकरआणि सर्व कार्यकारी मंडळ सदस्य धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगितले. तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेले उत्तम सहकार्य, शालेय विद्यार्थी यांनी शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन यामध्ये शिस्तबद्धता आणण्यासाठी केलेले सहकार्य या सर्वांचा परिपोष म्हणजे हे यश असल्याचेही म्हटले आहे. 

या यशाबद्दल उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षक - पालक सभेमध्ये या यशाबद्दल केलेला सत्कार याने आपला आणखी आनंद द्विगुणित झाला, असे मत श्री नाईक यांनी व्यक्त केले आहे. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त  झाल्याबद्दल संस्थेच्या कार्याध्यक्षा कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष मा. डॉ. श्री मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, खजिनदार वैभव नाईक आणि सर्व कार्यकारणी सदस्य ( बी. एन. एस. पी. मंडळ मुंबई) तसेच शालेय समिती, शिक्षक - पालक संघ व सर्व ग्रामस्थ यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.