अभंग गायन स्पर्धेत भाविक मेस्त्री प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: June 24, 2024 07:05 AM
views 179  views

सावंतवाडी : राधारंग फाऊंडेशन, सिंधुदुर्ग व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या तर्फे 18 वर्षांखालील मुला-मुलींसाठी प्रभाकर वेलींग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभंग गायन स्पर्धेचे आयोजन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक भाविक गजानन मेस्त्री (तेंडोली) ह्याने प्राप्त केला. यात द्वितीय क्रमांकांचा मानकरी मंदार बापू नाईक (तुळस - वेंगुर्ला), तृतीय क्रमांक चिन्मयी निलेश मेस्त्री ( इन्सुली - सावंतवाडी) तर उत्तेजनार्थ क्रमांक अलिषा यशवंत मेस्त्री (सावंतवाडी) व आर्या गणेश आजगावकर (आजगाव) यांनी प्राप्त केला. स्पर्धकांचा व सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याला मिळाला. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध गायक स्वप्निल गोरे यांनी केले. स्पर्धेस संगीत साथ निरज मिलिंद भोसले (तबला), मंगेश रामचंद्र मेस्त्री(ऑर्गन), पुरुषोत्तम(समर्थ) सीताराम केळुसकर (हार्मोनियम) व भास्कर मेस्त्री यांनी मंजिरी साथ केली. तर संपुर्ण स्पर्धेचे निवेदन नितीन धामापूरकर व सौ. सिद्धी परब यांनी केले. ध्वनी व्यवस्था हेमंत मेस्त्री यांनी सांभाळली. 

 स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक सौ.अर्चना घारे - परब यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ निवेदक  संजय कात्रे व राधारंग फाउंडेशन चे अध्यक्ष हेमंत खानोलकर, उपाध्यक्ष ऍड. पी. डी. देसाई, सचिव पूर्वा नाईक, सचिन सामंत, अमेय देसाई, अरुणा सामंत, गुरुनाथ नार्वेकर, प्रथमेश नाईक तसेच सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष निलेश मेस्त्री, सचिव वैभव केंकरे, किशोर सावंत, सोमा सावंत, आदी पदाधिकारी, विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीचे नंदू शिरोडकर उपस्थित होते. त्याच बरोबर जिल्ह्यातील नामवंत पखवाज वादक आनंद मोरये, सुप्रसिध्द भजनी बुवा कृष्णा राऊळ, गजानन मेस्त्री, मालवणी कवी दादा मडकईकर आदी मान्यवरांनी स्पर्धेतील मुलांना प्रोत्साहन देत उपस्थिती दर्शवली. संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मधुरा खानोलकर, गोविंद मळगावकर, निरज भोसले, मंगेश मेस्त्री, समर्थ केळुसकर, मनिष पवार, केतकी सावंत, सर्वेश राऊळ, सहील चोचे, अक्षय रमाणे यांनी मेहनत घेतली. स्पर्धेस सावंतवाडी परिसरातील व जिल्हाभरातील रसिकांचा अभुतपूर्व प्रतिसाद लाभला.