
गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघातूून आमदार भास्कर जाधव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भास्कर जाधव हे महाविकास आघाडीकडून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.
त्यांनी प्रथम गुहागर शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीने आपल्या गुहागर येथील कार्यालयाजवळ येऊन उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांसमवेत व्याडेश्वराचे सहपत्नी दर्शन घेतले. तिथून काही मोजक्याच कार्यकर्त्यां समवेत आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
त्यावेळी त्यांच्या समवेत पत्नी सुवर्णाताई जाधव, मुलगा समीर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, आरपीआयचे सुभाष मोहिते आधी उपस्थित होते. नंतर त्यांनी बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला.