महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिषदेची ताकद निर्माण करणार : भरत केसरकर कार्याध्यक्षपदी राजेंद्र माणगावकर, कार्यवाहपदी नंदन घोगळे तर संघटकपदी रूपेश पाटील
Edited by: विनायक गावस
Published on: October 03, 2023 11:07 AM
views 120  views

*




सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी भरत केसरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर  कार्याध्यक्षपदी राजेंद्र माणगावकर, कार्यवाह नंदन घोगळे,संघटकपदी रुपेश पाटील, उपाध्यक्षपदी संजय राठोड,कोषाध्यक्ष किशोर सोन्सुरकर,महिला आघाडी प्रमुख श्वेता प्रवीण मोरजकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे शिक्षक परिषदेच्या विशेष सभेमध्ये जाहीर केली.

   

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्याच्या धोरणाप्रमाणे तीन वर्ष कार्यकारांनी निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी माणगाव हायस्कूलचे शिक्षक आणि शिक्षक परिषदेचे कुडाळ तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष असलेले भरत  केसरकर यांची बिनविरोध एकमताने निवड पुढील तीन वर्षासाठी राज्याचे परिषदेचे अध्यक्ष वेनुनाथ कडू  यांनी घोषित केली. यावेळी तीन वर्षासाठी जोमाने संघटना वाढवून शिक्षक परिषदेचे प्राबल्य पुन्हा एकदा जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी नवीन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे असे सांगत नवीन कार्यकारणीच्या निवडीला वेणूनाथ कडू यांनी शुभेच्छा दिल्या. तर कैलासवासी शिक्षक आमदार वसंत बापट, कैलासवासी शिक्षक आमदार रामनाथ मोते,अशोक मोडक  यांच्या कामाचा आदर्श व धडाका लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनात्मक दृष्ट्या नंबर वन बनवण्याचे आपले प्रयत्न राहतील असे निवडीनंतर सांगत भरत केसरकर यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटना वाढीसाठी जोमाने प्रयत्न केले जातील असे सांगितले. सर्वांनी या निवडीसाठी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून शिक्षक परिषदेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी आपण जीवाची बाजी लावून काम करेन असे आश्वासन देवून सर्वांना नुतन अध्यक्ष भरत केसरकर यांनी धन्यवाद दिले. 


यावेळी या बैठकीला राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू,मावळते अध्यक्ष राजेंद्र माणगावकर,मावळते कार्यवाह सलिम तकीलदार, नुतन अध्यक्ष भरत केसरकर,जेष्ठ शिक्षक वाय.पी.नाईक,शिवाजी सागडे,लक्ष्मण वालगुडे,सुधीर खानोलकर,प्रवीण सानप,प्रवीण पारकर,सुविधा तावडे,सुरेश उर्फ सचिन कुडाळकर,विनोद जाधव,दिपक केसरकर,यतिन धुरी,अंकुश वरक,महादेव चव्हाण,संजय बेले,नारायण खरात, फर्जत सर,सिद्धेश कुलकर्णी,मानकर सर,कासकर सर,चंद्रकांत काणकेकर,सुनिल घुगरे यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या निवडीनंतर नुतन जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कार्याध्यक्ष राजेंद्र माणगावकर,कार्यवाह नंदन घोगळे,संघटक रुपेश पाटील, उपाध्यक्ष संजय राठोड,कोषाध्यक्ष किशोर सोन्सुरकर,महिला आघाडी प्रमुख श्वेता प्रवीण मोरजकर आणी इतर नुतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारांचे अभिनंदन राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी केले आहे.