
कणकवली : जिल्ह्यात गुरुवारी गुरुपौर्णिमेनिमित्त कणकवलीमधील भालचंद्र महाराज संस्थानच्या माध्यमातून गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्सहात सपन्न झाला.
सकाळी काकड आरती, त्यानंतर पाद्यपूजन तसेच सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होतं आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कणकवली शहरवासीय व भाविकांनीही भालचंद्र महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सकाळपासूनचं मोठी गर्दी केली आहे.