
बांदा : भालावल-फौजदारवाडी येथील संतोष नारायण गुळेकर (वय ४८) यांचा घातपात झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पार्टीत झालेल्या वादातून त्यांचा घातपात झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी रात्री खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तसेच मुख्य संशयित चेतन रवींद्र परब (वय ३५) याला सायंकाळी उशिरा पोलिसांनी अटक केली. पार्टीत सहभागी असलेल्या अन्य सहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस चौकशी सुरू असून चौकशीनंतर सर्व प्रकार स्पष्ट होणार असून आरोपीच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत जलदगतीने तपास करण्याच्या सूचना बांदा पोलिसांना दिल्या आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक विकास बडवे करत आहेत.