जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत अणसूरचे सदगुरु प्रासादिक मंडळ प्रथम

कारिवडे-पेडवेवाडी ग्रामस्थांच्‍यावतीने आयोजन : वैभववाडीचे दत्तकृपा मंडळ व्‍दितीय
Edited by: ब्युरो
Published on: February 17, 2024 14:12 PM
views 78  views

सावंतवाडी : माघी गणेश जयंतीनिमित्त कारिवडे-पेडवेवाडी ग्रामस्थांकडून आयोजित निमंत्रीतांच्‍या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्‍यातील अणसूरच्‍या सदगुरु प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. 

कारिवडे-पेडवेवाडी ग्रामस्थांकडून  १३ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये पाच तालुक्यातील नामांकित भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भोसले पॉलिटेक्निकचे चेअरमन अच्युत भोसले यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर कारिवडे ग्रामस्थांच्यावतीने भोसले पॉलिटेक्निकचे चेअरमनअच्युत भोसले तसेच डॉक्टर राजेशकुमार गुप्ता यांचा  सत्कार गुणगौरव करण्यात आला. तसेच माजी सौनिकनागेश गावडे यांनी नुकतीच भारतीय सैन्यदलात आपली बावीस वर्षे सेवा बजावून सेवा निवृत्त झाल्याबद्‍दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उद्योग सहकारी संस्था चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल संदिप माळकर, कवी मनोहर परब विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल, तनिष  गावडे, भदु परब  यांचा कारिवडे पेडवेवाडी ग्रामस्थ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

या स्पर्धेमध्‍ये प्रथम क्रमांक सदगुरु प्रासादिक भजन मंडळ, अणसुर, बुवा- हर्षल मेस्त्री, द्वितीय क्रमांक दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी, बुवा: विराज‌ तांबे, तृतीय क्रमांक श्री देवी माऊली भजन मंडळ, साटेली-बुवा सत्यनारायण कळंगुटकर, उत्तेजनार्थ पावणाई प्रासादिक भजन मंडळ, जानवली, कणकवली-बुवा  योगेश मेस्त्री, उत्कृष्ट गायक सदगुरु प्रासादिक भजन मंडळ, अणसुर- हर्षल मेस्त्री, उत्कृष्ट संवादिनी-सातेरी प्रासादिक भजन मंडळ सातोळी  निलेश आरोलकर, उत्कृष्ट पखवाजवादक-सदगुरु प्रासादिक भजन मंडळ, अणसुर  भावेश राणे, उत्कृष्ट तबलावादक-पावणाई प्रासादिक भजन मंडळ, जानवली, कणकवली  प्रथमेश नाईक, उत्कृष्ट कोरस-सातेरी प्रासादिक भजन मंडळ- सातोळी, हेळेकर देवावर विशेष गजर सादरीकरण सदगुरु प्रासादिक भजन मंडळ,अणसुर यांनी पारितोषिके पटकावली.

यावेळी उपस़्थित कारिवडे गावचे सरपंच आरती माळकर, उपसरपंच नितिन गावडे, माजी सरपंचअपर्णा तळवणेकर,भाजपा आंबोली मंडल उपाध्यक्ष अशोक माळकर, हेळेकर युवक मंडळ अध्यक्ष आनंद परब, कृष्णा परब, विजय‌ माळकर, अनंत झिडगे, तानाजी माळकर, परशुराम पालव, भानु सावंत, आदी उपस्थित होते. या भजन स्पर्धेचे परिक्षण  प्रकाश चिले व  महेश परब यांनी केले.