आरोस बाजार इथं २५ नोव्हेंबरला गावमर्यादित भजन स्पर्धा

Edited by: विनायक गावस
Published on: November 22, 2023 15:42 PM
views 84  views

सावंतवाडी : सरपंच नीलेश आरोलकर व माजी सरपंच दादा पालयेकर व जय हनुमान मित्रमंडळ,दांडेली ग्रामस्थ आयोजित दांडेली आरोस गाव मर्यादित हनुमान रंगमंच आरोस बाजार येथे सायंकाळी ५ वाजता भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रथम पारितोषिक ५००० रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक ३००० रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक २००० रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिक १००० रुपये व सन्मानचिन्ह तसेच हार्मोनियम, गायक, तबला, पखवाज, झांज, कोरस वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहे.