अमृत महोत्सवानिमित्त कामळेवीर विठ्ठल रखुमाई मंदिरात भजन स्पर्धा

Edited by: विनायक गावस
Published on: August 13, 2023 14:23 PM
views 126  views

सावंतवाडी : श्री विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ कामळेवीर बाजार,येथे अमृत महोत्सवानिमित्त सोमवार 14 ऑगस्ट 2023 तें 15ऑगस्ट 2023 रोजी कामळेवीर विठ्ठल रखुमाई मंदिरात भजन स्पर्धा नाद भजनाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक- रुपेश कानडे, अध्यक्ष भाजप युवा मोर्चा मंडळ, कुडाळ यांजकडून -5001रु, द्वितीय पारितोषिक-सचिन रेडकर, सामाजिक कार्यकर्ते यांजकडून -3001रु, तृतीय पारितोषिक- सौ स्वप्ना वारंग माजी पंचायत समिती सदस्य यांजकडून -2001रु, उत्तेजनार्त -रमेश वायगणकर यांजकडून -1001रु तसेच वैयक्तिक  बक्षिसे -शिस्त बद्ध मंडळ संदीप होडावडेकर यांजकडून 1001रु उत्कृष्ट गायक- श्री महेश वराडकर यांज कडून -501रु,उत्कृष्ट हार्मोनियम -श्री अक्षय पेडणेकर  यांजकडून -501रु उत्कृष्ट पखवाज- श्री सुभाष वेंगुर्लेकर यांजकडून -501रु, उत्कृष्ट तबला -श्री मंथन रेडकर यांजकडून -501रु, उत्कृष्ट कोरस- श्री प्रवीण रेडकर यांज कडून -501रु.तसेच सर्व भजन मंडळाना मोहम्मद पटेल यांजकडून सन्मानचिन्ह देण्यात येणार,सोमवार दि 14ऑगस्ट 2023सायं -6.00 वा -स्वामी समर्थ प्रा. भजन मंडळ आडेली.

सायं -6.45 वा -नटराज भजन मंडळ पिंगुळी.सायं -7.30 वा -श्री सिद्धेश्वर प्रा भजन मंडळ वायगणी सुरणगपाणी

रात्री -8.15 वा -श्री लक्ष्मीनारायण भजन मंडळ वालावलं रात्री -9.00 वा -कलेश्वर प्रा भजन मंडळ वेत्ये.

मंगळवार दि.15 ऑगस्ट 2023,

सायं -6.00 वा -श्री भूतनाथ प्रा भजन मंडळ निरवडे.

सायं -6.30 वा -श्री गोठण प्रा भजन मंडळ वजराठ

सायं -7.30 वा -श्री मुसळेश्वर प्रा भजन मंडळ मळेवाड

रात्री -8.15 वा -श्री विठ्ठल रखुमाई प्रा भजन मंडळ आंदुर्ले

रात्री -9.00 वा -श्री रवळनाथ प्रा भजन मंडळ पाडलोस.

तरि या सर्व भजन स्पर्धाचा भजन प्रेमीनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ कामळेवीर बाजार यांच्या वतीने करण्यात आले आहे.