भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००

Edited by:
Published on: May 13, 2025 19:45 PM
views 10  views

सावंतवाडी : माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक कार्तिकी अतुल कासार ९५%, द्वितीय क्रमांक हंसिका शामसुंदर मांजरेकर ९२.६०%, तृतीय क्रमांक हर्ष लोकेश कानसे ९०.४० % या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, सचिव सिए लक्ष्मण नाईक, उपाध्यक्ष नारायण कानसे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक भाऊसाहेब चौरे, इतर शिक्षक व कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.