
सावंतवाडी : एस टी एस म्हणजेच सिंधूरत्न टॅंलेन्ट सर्च परिक्षा हि परिक्षा युवा संदेश प्रतिष्ठान, नाटळ सांगवे यांच्या मार्फत घेतली जाते. या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून भगवती कोचिंग क्लासेस कोलगावचा निकाल १००% लागला आहे.
या परिक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केले. त्यापैकी इयत्ता 2 री मधील कुमार योजित योगेश करमळकर (गुण 136, जि.प.पू.प्रा शाळा नं.३) या विद्यार्थ्याने या परीक्षेत रौप्य पदक प्राप्त केले. कुमारी निधी शशिकांत राऊन इयत्ता 2री (गुण 120, जि. प. पू. प्रा शाळा नं. 2) हिने कांस्य पदक पटकविले. परिक्षेत सहभागी असलेले अरफ शेख, आयुष घाटकर, वैष्णवी धुरी, कृतिका सुतार या सर्वच विद्यार्थ्यांना भगवती कोचिंग क्लासेसच्या संचालिका सौ. स्वरा सागर चव्हाण यांचे मागदर्शन लाभले. सौ. चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन दिले.