दीपक केसरकरांपासून सावध राहा !

युवराज लखमराजेंना प्रविण भोंसलेंचा सल्ला !
Edited by: विनायक गावस
Published on: June 07, 2023 18:47 PM
views 135  views

सावंतवाडी : शहरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आला. नागरी समितीचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं होतं. याबाबत बोलताना माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले म्हणाले, युवराज लखमराजे भोंसले यांचे दिल्लीत मोदी, शहांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यापासून त्यांनी सावध रहावं. केसरकरांना मी अनुभवलेलं आहे असा सल्ला प्रविण भोसले यांनी युवराजांना दिला. तर युवराज राजकारणात नुकतेच आलेत. त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सावध राहावं खरा मद केसरकर खाणार असं विधान करत आपुलकीचा सल्ला युवराजांना देत असल्याच प्रविण भोसले म्हणाले. 


यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर,  महिला जिल्हा अध्यक्ष उद्योग व्यापार सौ दर्शना बाबर देसाई,  चराठा ग्रामपंचायत सदस्य सौ गौरी गावडे, महिला शहराध्यक्ष अँड.सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी,  अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष ईफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, सौ. मारीता फर्नांडिस,सौ पूजा दळवी आदी उपस्थित होते.