'बेटी बचाव' समुह नृत्य ठरले लक्षवेधी..!

Edited by:
Published on: March 15, 2024 14:00 PM
views 116  views

सावंतवाडी : माजगाव ग्रामसंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात माजगाव शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले 'बेटी बचाव' समुह नृत्य लक्षवेधी ठरले. शाळेच्या या नृत्याने प्रबोधनासह मनोरंजन केल्याने या महिला मेळाव्यातील उपस्थित महिला बेहद खुश झाल्या. त्यामुळे शाळेच्या या समुह नृत्याचे माजगाव परिसरातून कौतुक होत आहे. यावेळी सरपंच डॉ अर्चना सावंत ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडी शिक्षिका मेस्त्री, सौ सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आरोही बिडये, पालक, माजगाव बचत गट अध्यक्षा श्रीमती सपना गावडे,  सौ श्रिया सावंत, सुष्मिता परब आदी महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या समूह नृत्यात या शाळेतील अदिती ढवळे, काव्या गावडे, रंजना मडिवाळ, आर्ची बिडये, स्मिता चौरे, उर्वी टक्केकर, शुभ्रा सावंत, श्रेया नाईक, नागराज कुरुमकर, देवेन माळकर, योग सोनवणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी माजगाव ग्राम संघाच्यावतीने सरपंच डॉ सौ अर्चना सावंत यांच्याहस्ते समूह नृत्यातील या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या नृत्य नृत्याचे दिग्दर्शन शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती शलाका केरकर यांनी केले तर यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अमित कुमार टक्केकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आरोही भिडे, सर्व पालक शाळा माजगाव शाळा नं ३ च्या सपना गावडे आदींचे सहकार्य लाभले.

मुलांच्या सुप्त गुणांसह त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माजगाव शाळा नंबर ३  विविध उपक्रम राबवते. यावर्षी या शाळेच्या बेटी बचाव' या समुह नृत्याने माजगाव केंद्रस्तर क्रीडा स्पर्धा मध्ये प्रथम तर सावंतवाडी बीट स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. तसेच सावंतवाडीत झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात या नृत्याच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे सर्वांनाच मोहिनी घातली.