कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव...!

सर्वच स्तरातून शुभेच्छा | सिंधुदुर्गातील नागरिकांचे प्रेम पाहून भारावून गेलो : अजयकुमार सर्वगोड
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 31, 2024 09:22 AM
views 233  views

कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी व कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सर्व सामान्य नागरिकांनी हजेरी लावत शुभचिंतन केले.विशेष म्हणजे श्री.सर्वगोड यांचा हा वाढदिवस पत्नी वंदना, मुलगा अक्षय, मुलगी प्रियंका, सून सायली पाटील,नातू अनाएका आपल्या कुटुंबीयांसमवेत साजरा करण्यात आला.

कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात सकाळपासूनच सर्वगोड यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय,राजकीय नेते,सर्वसामान्य नागरिक आणि जिल्ह्यातील ठेकेदार,पत्रकार,बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत,भाजपा आमदार नितेश राणे,शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीवरून व प्रत्यक्ष भेट घेवून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,सतीश सावंत,अनंत पिळणकर, महेश सावंत,अनिस नाईक दिल्या. तसेच ओमटेक असोसिएट पार्टनर हेमंत देसाई, लोके, पेडणेकर,शासकीय ठेकेदार सहदेव चव्हाण, तेजस चव्हाण, रामदास विखाळे, मनोज परब, भाजपाचे महेश सावंत यांच्याकडून  शुभेच्छा देण्यात आल्या.