
वैभववाडी : उंबर्डे येथील चाॅंद नवभारत विकास सेवा सोसायटी व्हाईस चेअरमनपदी रमजान इब्राहिम बोबडे यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर माजी सरपंच शेरपुद्दीन बोबडे यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
सोसायटीचे व्हाईस चेअरमनपद गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते.या पदासाठी रमजान बोबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.श्री.बोबडे हे गेली पंधरा वर्षे सोसायटीचे संचालक म्हणून काम करीत होते.त्यांच्या या अनुभवाचा फायदा सोसायटीला व्हावा या उद्देशाने सर्व संचालकांनी मिळून त्यांची व्हाईस चेअरमनपदी निवड केली आहे.यावेळी चेअरमन उमर रमदुल,माजी सरपंच शेरपुद्दीन बोबडे, पोलीस पाटील विजय दळवी,माजी तंटामुक्ती अध्यक्ष रत्नाकर बंदकर, संचालक पांडुरंग काळे,समीर लांजेकर,अलिबा बोबडे,विजय सकपाळ, जगदीश मोपेरकर, रमजान रमदुल,धर्मरक्षीत जाधव,गौस पाटणकर,फतिमा रमदुल,हमिदा बोबडे आदी उपस्थित होते.