वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण..? | पणदुर पंचक्रोशीत जोरदार चर्चा !

Edited by:
Published on: September 04, 2023 20:25 PM
views 888  views

कुडाळ : मुंबई गोवा महामार्ग लगत वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयातील एका वैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची चर्चा पणदुर पंचक्रोशी मध्ये रंगू लागली आहे. वैद्यकीय सेवा देणारा तो आरोग्य कर्मचारी आपले सेवा बजावत असताना या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की होत कांनशीलात लगावल्याची चर्चा रंगत आहे. मुंबई स्थित असलेल्या एका व्यक्तीकडून ही मारहाण झाल्याची चर्चा ऐकू येत आहे.

मारहाण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यावर नजीकच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशीही चर्चा रंगत आहे. मात्र वैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण झाली अशी चर्चा रंगत असली तरी कुडाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत त्या कर्मचाऱ्यांकडून याची तक्रार करण्यात आली नव्हती.