शुल्लक गोष्टीवरून मारहाण | प्रकरण पोलीस ठाण्यात

Edited by: दिपेश परब
Published on: July 22, 2023 20:09 PM
views 473  views

वेंगुर्ले : वेतोरे-वरचीवाडी येथील गजानन सिताराम नाईक यांनी सामाईक जमिनीमध्ये आपल्या मालकिची मोटर सायकल लावली याचा राग मनात ठेवून तेथीलच विश्वनाथ जगन्नाथ नाईक, अंबिका जगन्नाथ नाईक, विश्वनाथ नाईक यांचे भावोजी व बहिण धुरी (रहाणार- वाडीवरवडे) यांनी त्यांना शिवीगाळ करीत, दांडयाने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीसांत चार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

वेतोरे-वरचीवाडी येथील गजानन सिताराम नाईक (३२) हे सामाईक जमिनीमध्ये आपली मोटर सायकल लावली. त्याचा राग मनांत धरून तेथीलच विश्वनाथ जगन्नाथ नाईक, अंबिका जगन्नाथ नाईक, विश्वनाथ नाईक यांचे भावोजी व बहिण घुरी (रहाणार- वाडीवरवडे) यांनी, त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच विश्वनाथ नाईक व त्यांचे भावोजी धुरी यांनी गजानन नाईक यांना हाताने पकडून दोन्ही पायावर व उजव्या डोळ्याच्यावर डोकीखालील भागावर दांड्याने मारून त्यांना जखमी केले. अशी तक्रार गजानन नाईक यांनी वेंगुर्ले पोलीसांत दिली आहे. त्यानुसार विश्वनाथ जगन्नाथ नाईक, अंबिका जगन्नाथ नाईक, विश्वनाथ नाईक यांचे भावोजी व बहिण धुरी (रहाणार-वाडीवरवडे) अशा चौघांवर वेंगुर्ले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनखाली हेड कॉन्स्टेबल योगेश सराफदार करीत आहेत.