'बिस्ट जोकर फिटनेस' तर्फे भव्य फिटनेस फेस्टिव्हल

Edited by: विनायक गांवस
Published on: December 30, 2024 13:42 PM
views 75  views

सावंतवाडी :  राणी पार्वती देवी जुनिअर कॉलेजमध्ये 'बिस्ट जोकर फिटनेस' तर्फे भव्य फिटनेस फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.फिटनेसप्रेमींसाठी आयोजित उत्सव फिटनेस आणि आरोग्याच्या प्रचारासाठी एक अद्वितीय उपक्रम ठरला. 


या फेस्टिव्हलचे आयोजन बिस्ट जोकर फिटनेसचे मालक सौरभ वारंग आणि आर.पी.डी. जु. कॉलेजचे जी. एस. भावेश सापळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. फेस्टिव्हलमध्ये ''मिस्टर RPD शरीरसौष्ठव स्पर्धा'', डेडलिफ्ट, प्लॅंक, दोरीउडी, क्रॉसफिट, पुशअप, स्क्वॅट्स असे खेळ आयोजित केले होते. राणी पार्वती देवी जुनिअर कॉलेज येथे हे फेस्टिव्हल पार पडल. या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे तरुणांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करणे व सर्वांमध्ये निरोगी जीवनशैली रुजविणे हे होत. विशेष म्हणजे, या स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना बिस्ट जोकर फिटनेस तर्फे दोन महिन्यांसाठी मोफत जिम सदस्यत्व देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना ट्रॉफी व पदक प्रदान करण्यात आली. हा उपक्रम विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या फिटनेस प्रवासाला पुढे नेण्यासाठी एक प्रेरणा ठरला. स्पर्धेमधील विविध प्रकारांमध्ये विजयी ठरलेल्या युवक आणि युवती सहभागींमध्ये जबरदस्त उत्साह दिसून आला.त्याचबरोबर फिटनेसप्रती जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरला आहे.