भात बियाणे खरेदी करताना ही काळजी घ्या...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 12, 2023 15:23 PM
views 158  views

भात बियाणे रासायनिक खते औषधे तसेच अवजारे खरेदी करताना अधिकृत शासनमान्य परवानाधारक कृषी केंद्र वरूनच खरेदी करा तसेच त्याचे पक्के बिल त्या केंद्राधाराकडून मागून घ्या व पैसे द्या आपली फसवणूक टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये हे लक्षात ठेवा.

काय करावे

अधिकृत शासनमान्य परवानाधारक कृषि केंद्रावरून बि-बियाणे खते व औष खरेदी करा कारण सरकारमान्य उत्पादनांचीच गुणवत्ता चांगली असते.  खरेदीची पक्की पावती मिळते.


खरेदी पावती / बिल भविष्यात होणाऱ्या नुकसानीस उपयोगी असते.

शेतीबाबत / पिकाबाबत ज्ञान असल्याने सल्ला व मार्गदर्शन मिळते.

विक्रेते स्थानिक असल्याने पिकाच्या कालावधीत भेट होऊ शकते.

सरकारमान्य उत्पादने वापरल्याने उत्पादन चांगले येते.

काय करू नये

फेरीवाले विक्रेते (घरपोच सेवा देणारे) यांचेकडून बि-बियाणे खते व औषधे खरेदी करू नये कारण यांचेकडील उत्पादने सरकारमान्य नसुन बोगस असतात. या उत्पादनाच्या वापराने उत्पादनात फरक पडत नाही.खरेदीची पावती भविष्यात होणाऱ्या नुकसानास उपयोगी नाही.शेतीबाबत काही एक ज्ञान नसते.केवळ विक्री हाच एकमेव उद्देश. स्थानिक नसल्याने पिकाच्या नुकसानी नंतर भेट होत नाही.काही वेळा उत्पादक कंपनीच अस्तित्वात नसते. त्यामुळे अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क करावा.