
मालवण : येथील टोपीवाला हायस्कूलच्या १९६८ सालच्या बॅचचा 'स्नेह मेळावा' नुकताच हायस्कूलच्या सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार
पडला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रथमतः दिवंगत माजी विद्यार्थी कै. रेमेत फर्नांडीस व रत्नप्रभा कडू-पोरे ह्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. माजी विद्यार्थी चंदू जामसंडेकर यांनी प्रस्तावना करताना उपस्थितांचे यथोचित स्वागत केले.
गेली ९ वर्षे ह्या १९६८ चे बॅचमेट सातत्याने दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या आठवड्यात 'गेट टूगेदरचा' स्नेह मेळावा शाळेतच घेतात. ह्या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष दिगंबर सामंत यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच नवीन होणाऱ्या प्रकल्पाविषयी माहिती दिली. संस्थेचे संचालक अविनाश आजगावकर यांनी शुभेच्छापर भाषणात ह्या बॅचच्या सातत्याने दरवर्षी होणाऱ्या गेट टूगेदरचे कौतुक केले. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. खानोलकर यांनी माजी विद्यार्थी सतत शाळेच्या संपर्कात राहून शाळेविषयी असलेल्या आस्थेने कौतुक करून सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
१९६८ सालचे माजी विद्यार्थी जनार्दन उर्फ दादा सामंत यांनी शाळेने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले व ह्या शाळेमुळे आपण कृषी क्षेत्रात प्रगती केल्याच सांगितले. कार्यक्रमाला चंदू जामसंडेकर, दादा सामंत, मोती वणकुद्रे, जयंत पाटणकर, रामदास कांदळगावकर, प्रकाश कुशे, किशोरी परुळेकर, चित्रा वृषाली सामंत यांची समायोचित भाषणे झाली.
सदर कार्यक्रमाला सुधीर तारी, अनिल मालंडकर, रामदास कांदळगावकर, मोती वणकुंद्रे, चंदू नामसंडेकर, सहदेव गवंडी, रमेश करंगुटकर, प्रकाश तोरसकर, पोलो परेरा, विजयानंद अणावकर, जयंत पाटणकर, प्रदीप केंकरे, शिल्पा केंकरे, निशा पाटकर, संध्या सामंत, कविता वणकुंद्रे, सुमन देसाई, चित्रा उर्फ वृषाली सामंत, सिंधू जोशी आदी उपस्थित होते.