
सिंधुदुर्ग : वेंगुर्लाचे सुपुत्र संसदरत्न व सीमालढ्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे नेते तसेच माजी खासदार बॅरिस्टर नाथ पै यांचे ज्येष्ठ पुत्र आनंद पै यांचे 20 ऑगस्ट रोजी स्पेनमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांचे निधन झाले आहे.
आनंद पै यांचा मुंबई येथे जुलै 1961 मध्ये जन्म झाला होता. बॅरिस्टर नाथ पै यांचे जानेवारी 1971 मध्ये निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी क्रिस्टल यांनी पुत्र दिलीप तसेच आनंद यांच्यासोबत व्हिएन्ना येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आनंद हे 10 वर्षांचे होते. आनंद पै हे अलिकडेच आयटी क्षेत्रातील नोकरीतून निवृत्त झाले होते.आनंद यांना वडिलांप्रमाणेच वाचनाची आवड होती आणि त्याला साहित्य, वास्तुकला आणि तंत्रज्ञानात रस होता. ते एक उत्सुक प्रवासी होते. त्यांनी आयुष्यभर भारतावर प्रेम केले आणि दर काही वर्षांनी त्यांनी मुंबईला घरी भेट दिली.
त्यांची सर्वात अलीकडील मुंबई भेट नोव्हेंबर 2023 मध्ये होती आनंद पै यांच्यामागे परिवारात जोडीदार मारिया आणि धाकटे बंधू दिलीप असून ते ऑस्ट्रिया येथे वास्तव्यास आहेत. तर बॅरिस्टर नाथ पै यांच्या पत्नी क्रिस्टल यांचे जुलै 2018 मध्ये निधन झाले होते.
वेंगुर्ले येथे बॅरिस्टर नाथ पे यांचे जन्म व शिक्षण झाले. त्यामुळे त्यांचे आठवण म्हणून वेंगुर्ला येथे नाथ पे स्मारक उभारले जात आहे याचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाला संसदपटू व वेंगुर्ल्याचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पे यांचे ज्येष्ठ पुत्र आनंद पे हे भारतात वेंगुर्ले येथे येणार होते. मात्र त्यांचे अचानकपणे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बॅरिस्टर नाथ पे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील चीपी या विमानतळास बॅरिस्टर नाथ पे विमानतळ असे नामकरण करण्याची घोषणा सरकारने केली होती मात्र अद्याप पर्यंत चीपी विमानतळाचे नामकरण केवळ घोषणा ठरत आहे. त्यावेळेचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री व आताचे उद्योग मंत्री उदय सामत, वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्ग विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने नामकरण होईल अशी घोषणा केली होती मात्र दोन वर्ष उलटली तरी अद्याप पर्यंत नामकरण विषय बासनात गुंडाळला गेला आहे. बॅरिस्टर नाथ पे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आनंद पे हे वेंगुर्लेत आल्यानंतर चीपी विमानतळास आपल्या वडिलांचे नाव देण्यासंदर्भात सरकारला विनंती करणार होतो आता तरी सरकारला जाग यावी.