बापर्डे गावाला 'इंडोजर्मन ट्रेनिंग सेंटर' मधील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी दिली भेट..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 12, 2023 13:27 PM
views 263  views

देवगड : देवगड बापर्डे गावाला भेट देऊन 'इंडोजर्मन ट्रेनिंग सेंटर' मधील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी नाविन्य पूर्ण उपक्रमांची व स्वच्छता या विषयी माहिती घेतली.

बापर्डे गावाने स्वच्छतेमध्ये आपले नाव लौकीक मिळवल्यानंतर या गावात अभ्यास दौऱ्यासाठी अनेकांनी भेटी दिल्या असुन नुकतीच इंडोजर्मन ट्रेनिग सेंटरमधील ट्रेनिंग घेत असलेल्या  एमबीएच्या विद्यार्थी अभिजित काळे,देवांशी जैन,कार्तीक जाधव ,प्रियसी शहा,सिद्धांत वर्तक,सौम्या व्यंकटेशन व सर्वेश साळगांवकर या विद्यार्थ्यानी  ग्रामपंचायत बापर्डेला भेट दिली.

सदर भेटी दरम्यान ग्रामपंचायत बापर्डेने स्वच्छतेच्याबाबतीत केलेल्या कामांची पाहणी केली .ग्रामपंचायतीने राबविलेल्या नाविण्यपुर्ण उपक्रमांना भेट दिली व समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांच्या सोबत बापर्डे गावचे सुपुत्र सुहासजी राणे,बापर्डे गावचे सरपंच संजय लाड , सोसायटी चेअरमन अजित राणे, सुहास राणे बाबुराव राणे,फोटोग्रापर प्रज्वल गायकवाड व ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.