बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ लिपिक सुषमा जाधव ३९ वर्षाच्या सेवेतून निवृत्त !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 02, 2023 16:18 PM
views 417  views

देवगड  :  देवगड तालुक्यातील बँक ऑफ इंडिया शाखेतील वरिष्ठ लिपिक असलेल्या सौ.सुषमा किशोरकुमार जाधव या आपल्या ३९ वर्षाच्या बँक सेवेतून ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्या निमित्त त्याचा सेवनिवृत्तीपर विशेष निरोप समारंभ देवगड बँक ऑफ इंडिया शाखा कार्यालयात गुरुवारी सायंकाळी बँक शाखाधिकारी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली निवृत्त बँकक ऑफ इंडिया अधिकारी किशोरकुमार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या सोहळ्याचे औचित्य साधून शाखाधिकारी सिद्धार्थ वाघमारे यांनी त्या ३९ वर्षाच्या सेवेचा अनुभव अनुषंगाने विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव केला. तसेच बँक ऑफ इंडिया शाखा देवगड च्या वतीने भेटवस्तू शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला.बँक स्टाफ युनियन पुणे जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष निखिल साटम, जिल्हा सेक्रेटरी विजय महाडिक एसटी,एनटी ओबीसी संघटना यांचे वतीने सन्मानचिन्ह ,भेटवस्तू, छोटेसे रोपटे भेट देऊन यथोचित सन्मान केला. देवगड तालुक्यातील वाडा, मिठबाव,शिरगाव,तळेबाजार विजयदुर्ग या शाखा मार्फत ही त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे प्रास्तविक शाखाधिकारी सिद्धार्थ वाघमारे यांनी करून मॅन्युअल ते ऑनलाइन बँक सेवा बाबत आढावा घेत त्याच्या सेवेचे कौतुक केले.

बँक अधिकारी किशोरकुमार जाधव, निखिल साटम, सेवानिवृत्त कर्मचारी रमाकांत जोशी,संजय मालंडकर ,आनंधू अजय,कांशीराम लोके, ग्राहक दयानंद मांगले, प्रदीप सावंत सायली जाधव यांनी त्यांच्या यशस्वी सेवेबद्दल गौरवोद्गार काढले व शुभेच्छा व्यक्त केल्या. सौ सुषमा जाधव यांनी आपल्या ३९ वर्षातील बँकिंग सेवेतील प्रवास व अनुभव कथन केले . या प्रसंगी बँक अधिकारी- दिपक देवलासी,पियुष मिश्रा, लिपिक /रोखपाल काशीराम लोके कर्मचारी महेश नलावडे, तुषार भुजबळ, बँक ग्राहक , निलेश इंदुलीकर सेवानिवृत्त बँक कर्मचारी , श्री इंदुलकर, स्मिता भाबल तसेच वाडा मिठबाव विजयदुर्ग पडेल तळेबाजार शाखा कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते. आभार शाखाधिकारी सिद्धार्थ वाघमारे यांनी मानले.