स्थानिक मच्छीविक्रेत्यांकडून बांगलादेशींकडून मारहाण

मंत्री नितेश राणेंचा सज्जड दम
Edited by:
Published on: May 28, 2025 14:22 PM
views 340  views

मुंबई :  भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छीविक्रेत्या भगिनींना बांगलादेशी व घुसखोर रोहिंग्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला. या घटनेची तातडीने दखल घेत मंत्री नितेश राणे यांनी भाऊचा धक्का येथे भेट देऊन स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधला. 


दरम्यान, घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांकडून भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा पारंपरिक व्यवसाय गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते तसेच स्थानिक मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.