
बांदा : हनुमान जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्याभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत. मात्र बांद्यात हनुमान जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. हनुमानाची वेशभूषा करून संपूर्ण बाजारपेठेत दुकाने घरामध्ये जाऊन हनुमान प्रत्येकाला आशीर्वाद देतो व आपली शेपटी पाठीत मारूनआशीर्वाद देतो. असं म्हटलं जातं की हनुमानाने आपल्या शेपटीच्या सहाय्याने पाठीत मारले की इडा पीडा दूर होते अशी इथं मान्यता आहे. असा प्रत्यक्ष अनुभव आल्याचं सांगितलं जातं.
बांदा शहरात उभ्या बाजारमध्ये छोटस श्री हनुमान मंदिर आहे. त्या हनुमान मंदिरात हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. हनुमान जयंती निमित्त सकाळी हनुमानाच्या मूर्तीची पूजा करून बाजारपेठेतील एका मुलाला हनुमाची वेशभूषा करून संपूर्ण त्यांच्या अंगाला लाल रंग लावून त्याच्या सोबत सर्व बाजारपेठेतील आबालवृद्धांसह दुकानात घराकडे जातात. आशीर्वाद देतात.