
सावंतवाडी : दरवर्षी प्रमाणे यंदाही बांदा येथील आमची वाडी देऊळवाडी मित्रमंडळाने नरक चतुर्थी निमित्त बांदा पिंपळेश्वर गणपती मंदिर येथे रविवार दि. १९ ऑक्टोबर रोजी खुली नरकासूर स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५०००, द्वितीय १०००० व बांदा मर्यादीत स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ४४४४ व द्वितीय २२२२ रु देण्यात येणार आहे. तसेच खास दिवाळी निमित्त लकीड्रॉ कुन ठेवण्यात आली आहेत. त्यात रिफ्रेजेटर, कुलर, इलेक्ट्रॉनिक गिझर लकी ड्रॉ विजेत्याला देण्यात उरणार आहे. त्यामुळे या नरकासूर स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन आमचीवडी देऊळवाडी मित्रमंडळाने केले आहे.










