बांद्यात कट्टा कॉर्नर येथे श्रीराम चौकाची स्थापना

Edited by:
Published on: May 19, 2025 12:14 PM
views 172  views

सावंतवाडी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे गुरुजींचे हिंदुत्ववादी विचार कायमच हिंदू राष्ट्रासाठी प्रेरणादायी असतात. गुरुजींच्या विचारांचे अनुकरण प्रत्येक हिंदूने प्रामाणिकपणे केल्यास हिरवे साप वळवळणार नाहीत. प्रत्येक हिंदूने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे त्यातच आपले हित आहे.  असे राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री  नितेश राणे यांनी बांदा येथे केले. 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान शाखा बांदा तर्फे मुंबई -  गोवा महामार्गावर कट्टा कॉर्नर येथे श्रीराम चौकाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन संभाजीराव भिडे गुरुजींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितेश राणे बोलत होते. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर , बांदा उपसरपंच आबा धारगळकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, संदेश पावसकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, साई काणेकर, गुरु सावंत, मधुकर देसाई, प्रविण देसाई, सिद्धेश महाजन, गुरु कल्याणकर, निलेश सावंत, निलेश कदम, मंदार केसरकर, मंगेश पाटील आदिसह शेकडो हिंदू प्रेमी उपस्थित होते. यावेळी हिंदू राष्ट्र की जय आणि जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.