दोडामार्ग शहरात २२ जानेवारीला मांस, मच्छी, मटण व मद्य विक्रीस बंदी

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी काढली जाहीर सूचना | व्यावसायिक - मालकांना केलं सहकर्याचं आवाहन
Edited by:
Published on: January 19, 2024 12:49 PM
views 334  views

दोडामार्ग : अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग शहरात २२ जानेवारीला मांस, मच्छी, मटण व मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली असून यासाठी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी व्यावसायिकांना सहकार्याचे आवाहन केलं आहे. 

याबाबत नगराध्यक्ष चव्हाण यांनी शहरातील सर्व मटण, चिकन, मच्छी व चायनीज विक्रेत्यांना तसेच मांसाहारी हॉटेल व धाबा मालकांना जाहीर सूचना काढून कळविले आहे की, श्री क्षेत्र अयोध्या धाम येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव सोमवारी २२/०१/२०२४ रोजी होणार असून आपल्या शहरामध्ये हनुमान मंदिर व शहरातील इतर सर्व मंदिरांमध्ये मोठा उत्सव साजरा होणार आहे.

तरी शहरात कोणत्याही प्रकारचे मटण, चिकन, मच्छी तसेच देशी व विदेशी मद्य (दारू) विक्री करण्यास बंदी केली आहे. आपण आपली मटण, चिकन, मच्छी विक्री दुकाने, चायनीज दुकाने, मांसाहारी हॉटेल अथवा धाबा, मद्य (दारू) दुकाने मालकांनी कोणत्याही प्रकारे सुरु न ठेवता संपूर्ण बंद ठेवावी. सर्व विक्रेत्यांनी दुकान धारकांनीच्या सूचनेची दखल घेऊन श्री राम उत्सव व नगरपंचायतला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष चव्हाण यांनी केलं आहे.