
वेंगुर्ला : जमीन खरेदी करण्यास सक्त मनाई असे बॅनर सध्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावात झळकत आहेत. अज्ञातांकडून हे बॅनर लावण्यात आले असून याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. रेडी गावात आज्ञातांनी लावण्यात आलेल्या या बॅनर वर असे नमूद करण्यात आले आहे की, रेडी गावातील महसूलगाव गावतळे मध्ये रेडी बाहेरील व्यक्तीस जमीन खरेदि करण्यास सक्त मनाई आहे. जर कोण गावातळे ग्रामस्थ एजंटगिरी करत असेल त्याने पहिली स्वतःची जमीन दिल्याचा बोर्ड लावावा व नंतर विक्रीचे व्यवहार करावेत. असे लिहिण्यात आले आहे. दरम्यान या बॅनर वरून जोरदार उलटसुलट चर्चना उधाण आले आहे.